Share

“जेव्हा देशाला गरज होती, तेव्हा…” ; काँग्रेसचा हात सोडताना हार्दीक पटेल काय म्हणाले? वाचा सविस्तर

Published On: 

🕒 1 min read

गुजरात : गुजरात विधानसभा निवडणुक तोंडावर आहे आणि काँग्रेसकडून या निवडणुकीसाठी तयारी सुरु असताना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पाटीदार समाजाचे नेते असलेल्या हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. हार्दिक पटेल यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी काँग्रेस पक्षावर गंभीर टीका केली आहे. गुजरात काँग्रेसवर तर नाराजी व्यक्त केली आहे सोबतच राष्ट्रीय कार्यकारिणी आणि नेतृत्वावर आक्षेप नोंदवले आहेत. गुजराती अस्मिता आणि गुजरातच्या प्रश्नांबाबत काँग्रेस गंभीर नसल्याचे पटेल यांनी म्हंटले आहे.

हार्दिक पटेल यांच्या पत्राचा मराठी अनुवाद :

श्रीमती सोनिया गांधीजी

विषय : काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा देण्याबाबत.

अनेक प्रयत्नानंतरही काँग्रेस पक्षाकडून देश हित आणि समाजाच्या हित याच्या अगदी उलट कार्य केले जात असल्यामुळे काही गोष्टी तुमच्या लक्षात आणून देणे आवश्यक बनले आहे. हे 21 वे शतक आहे आणि भारत हा जगातला सर्वात जास्त तरुणांची संख्या असणारा देश आहे. देशातील तरुणांना एक सक्षम आणि खणकर नेतृत्व हवं आहे. काँग्रेस पक्ष केवळ विरोधाच्या राजकारणापुरताच मर्यादित राहिल्याचं मागील तीन वर्षापासून मला पाहायला मिळत आहे. देशातील लोकांना केवळ विरोध नकोय, त्यांना देशाच्या भवितव्याबाबत विचार करणारं नेतृत्व हवं आहे. अयोध्येतील राम मंदिर असो, सीएए-एनआरसी असेल, काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा विषय असेल किंवा जीएसटीचा निर्णय असेल, या सर्व मुद्द्यांवर देशातील लोकांना तोडगा हवा होता. काँग्रेस पक्षाने यात फक्त अडथळा बनण्याचं काम केलं आहे. देशात असो, गुजरात राज्य असो किंवा माझा पटेल समाज असो काँग्रेसने केवळ केंद्र सरकारला विरोध करण्यापलिकडे काहीही केलेलं नाही. त्यामुळेच देशातील जनतेने जवळपास संपूर्ण देशातून काँग्रेसला पूर्णपणे नाकारलं आहे. कारण काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या नेतृत्वाला साधा बेसिक रोडमॅपही देता आला नाही.

आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आपल्या खर्चाने दिवसाला ५०० – ६०० किलोमीटरचा प्रवास करतो. जनतेत मिसळतो. मात्र गुजरातमधील बडे नेते आमचं म्हणणं ऐकतच नाहीत. दिल्लीत आलेल्या नेत्यांना चिकन सँडविच वेळेत मिळाला की नाही यावर फक्त ते लक्ष देतात. मी अनेक तरुणांना भेटलो, तेव्हा गुजरातींचा अपमान करणाऱ्या पक्षात तुम्ही का आहात असं मला त्यांनी विचारलं. उद्योग क्षेत्र असो, धार्मिक क्षेत्र असो की राजकारण, प्रत्येक ठिकाणी गुजराती लोकांचा अपमान केला जातो. मला वाटतं काँग्रेसच्या नेतृत्वाने तरुणांचाही विश्वासघात केला आहे. म्हणूनच आजचा तरुण काँग्रेससोबत यायला तयार नाही.

कोणत्याही विषयाकडे गांभीर्याने पहायचं नाही, हा काँग्रेस नेतृत्वाचा मोठा दोष आहे. मी जेव्हा जेव्हा पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटलो, त्यांचं लक्ष गुजरातच्या लोकांकडे आणि गुजरातमधील समस्यांवर असण्यापेक्षा, त्यांचं लक्ष आपल्या मोबाईलमध्ये होतं आणि इतर गोष्टींवर होतं. जेव्हा जेव्हा देश संकटात सापडला अशावेळी काँग्रेस नेतृत्वाची गरज भासली तेव्हा आमचं नेतृत्व विदेशात होते. गुजरात आणि गुजराती माणसांबद्दल द्वेष असावा, अशीच ज्येष्ठ नेत्यांची मानसिकता पाहायला मिळाली.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोयीस्करपणे गुजरातच्या जनतेला दुर्बल केलं. स्वत:चं आर्थिक हित साधलं हे सांगताना अत्यंत दु:ख होत आहे. राजकीय विचारधारा वेगळी असू शकते. पण काँग्रेस नेत्यांचं असं विकलं जाणं हा म्हणजे राज्यातील जनतेचा विश्वासघातच आहे. जनतेची सेवा करणं हा राजकारणात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिचा धर्म असतो. दुर्देवाची गोष्ट म्हणजे काँग्रेसला गुजराती जनतेसाठी काही करायचं नाही. मी जेव्हा जेव्हा गुजरातसाठी काही चांगलं करायला गेलो, तेव्हा तेव्हा माझा तिरस्कार केला गेला. काँग्रेस नेतृत्वाच्या मनात आमचं राज्य, आमचा समाज आणि तरुणांबाबत इतका द्वेष आणि तिरस्कार असेल याचा मी कधी विचारच केला नव्हता.

आज मी हिंमत करून काँग्रेसचं पद आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. माझ्या या निर्णयाचं स्वागत माझे सहकारी आणि गुजरातची जनता करेल याचा मला विश्वास आहे. माझ्या या निर्णयानंतर भविष्यात गुजरातसाठी मी सकारात्मक कार्य करेल याचा मला विश्वास आहे. जनतेकडून मिळालेल्या प्रेमाचं ऋण फेडण्यासाठी मी कायम प्रयत्न करत राहील.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!