Share

IPL 2022 KKR vs LSG : कोलकाताशी भिडणार राहुलची लखनऊ, काय सांगते हेड टू हेड आकडेवारी? वाचा!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये पहिल्यांदाच उतरलेल्या लखनऊ सुपर जायन्ट्सने शानदार खेळ दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आयपीएल गुणतालिकेत लखनऊचा संघ १६ गुणांसह तीसऱ्या स्थानी विराजमान आहे. पण मागील खेळलेल्या दोन सामन्यात लखनऊला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ६६वा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईतील डी वाय पाटील स्टेडीयमवर खेळला जाईल. कोलकाताने त्यांच्या मागील खेळलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला असल्याने ते सध्या चांगल्या लयीत दिसत आहेत. लखनऊचा संघ या सामन्यात विजय मिळवून पहिल्या दोन स्थानावर राहण्याचा प्रयत्न करेल.

गुणातालीकेतील संघांची स्थिती

लखनऊ संघ १३ सामन्यात ८ विजय मिळवून गुणतालिकेत १६ अंकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे कोलकाताचा संघ १३ सामन्यांत ६ विजय मिळवून १२ अंकांसह सहाव्या स्थानी आहे. कोलकाताने जर आज मोठा विजय मिळवला त्यांना पहिल्या चार संघात जाण्याची संधी असणार आहे.

हेड टू हेड आकडेवारी

आयपीएलमध्ये हे दोन्ही संघ पहिल्यांदा ७ मे रोजी समोरासमोर आले होते. त्या सामन्यात लखनऊ संघाने कोलकातावर सहज विजय मिळवला होता. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनऊने १७६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकाताचा संघ १०१ धावांवरच गारद झाला होता. त्यामुळे आजच्या होणाऱ्या सामन्यात लखनऊची बाजू मजबूत दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!