मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये पंजाब किंग्जकडून खेळणारा शिखर धवन नव्या भूमिकेत दिसणार आहे. ‘गब्बर’ हा प्रसिद्ध स्पोर्ट्स सेलिब्रिटींपैकी एक आहे. क्रिकेटच्या खेळपट्टीवर आपली चमक दाखवल्यानंतर आता धवन कॅमेऱ्यासमोर आपला अंदाज दाखवणार आहे. तो आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार दिसणार आहे.
अभिनयासाठी धवनने जोरदार तयारी देखील केली आहे. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘गब्बर’ने काही काळापूर्वीच चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. मात्र, या चित्रपटाचे शीर्षक अद्याप समोर आलेले नाही. धवनला कलाकारांबद्दल खूप आदर आहे आणि जेव्हा त्याला या चित्रपटाची ऑफर मिळाली तेव्हा तो याबद्दल खूप आनंदी होता.
Reports state that @SDhawan25 making his Bollywood debut soon. If this is true, it's a treat for Gabbar fans.#ShikharDhawan #siddharthkannan #sidk #IPL2022 pic.twitter.com/MRHeCl1zFG
— Siddharth R Kannan (@sidkannan) May 17, 2022
शिखर चित्रपटाच्या त्या भागासाठी योग्य असल्याचे निर्मात्यांना वाटले. अशा परिस्थितीत जेव्हा निर्मात्यांनी धवनशी संपर्क साधला तेव्हा तो त्याला नाकारू शकला नाही. गेल्या महिन्यातच धवनला ही भूमिका ऑफर करण्यात आली होती. धवन या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

