🕒 1 min read
Rahul Gandhi PC | अकोला : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रातील अकोला (Akola) जिल्ह्यात आहे. बुधवारी राहुल गांधी यांनी वाशिममध्ये पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला आणि महागाईसाठी त्यांना जबाबदार धरले. शेतकऱ्यांचे नुकसान करणारा आज देशभक्त झाला आहे, असे ते म्हणाले होते. पंतप्रधान मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांना नोटबंदीसारख्या अनेक चुकीच्या निर्णयांना सामोरे जावे लागले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. दरम्यान आज राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. मराठी प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी मराठीतूनच प्रश्न विचारा मला समजते, असे विधान केले.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या विदर्भातील अकोला जिल्ह्यात आहेत. ग्रामिण विभाग असल्यामुळे मराठी भाषिक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मात्र राहुल गांधींना मराठीत प्रश्न विचारावे की हिंदीत, अशी धांदल पत्रकारांची उडाली होती. संयोजकांनी हिंदीत प्रश्न विचारा म्हणून पत्रकारांना विनंती केली. मात्र यावेळी राहुल गांधी म्हणाले, “मराठीत प्रश्न विचारा, ते चांगलं राहील. मराठी मला समजते.”
यावेळी राहुल गांधींनी पत्रकारांच्या प्रश्नाला रोखठोक उत्तरे दिली. राहुल गांधी म्हणाले, “गेल्या आठ वर्षापासून भारतात भितीचे वातावरण आहे. द्वेष आणि हिंसेचे वातावरण तयार करण्यात येत आहे. भाजपचे नेते मंडळी भारतातील शेतकऱ्यांशी चर्चा करत नाहीत. युवकांशी ते चर्चा करत नाहीत. त्यांनी चर्चा केली असतील तर त्यांना समजले असते की शेतकरी आणि युवकांना समोरचा रस्ता दिसत नाही. बेरोजगारी वाढत आहे. महागाई वाढत आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. या विरोधात उभे राहण्यासाठी आम्ही भारत जोडो यात्रा सुरु केली आहे.”
राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर देखील भाष्य केले. भारत जोडो यात्रा रोखून दाखवा असे आव्हान राहुल गांधी यांनी शिंदे-भाजप सरकारला दिले. खासदार राहुल शेवाळे यांनी यात्रा रोखावी म्हणून मागणी केली होती. राहुल गांधी म्हणाले कुणाचा काही विचार असेल तर ते व्यक्त केले पाहीजेत. सरकारला वाटले की भारत जोडो यात्रेला थांबवावे तर त्यांनी प्रयत्न करावे.
सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधी ठाम राहीले. यावेळी राहुल गांधी यांनी काही कागदपत्रे दाखवली. ‘मै आपका नौकर रहना चाहता हु’, असे पत्र वीर सावरकर यांनी इंग्रजांना लिहले होते, असे राहुल गांधी यांनी सांगितले. हे पत्र माझ्यासाठी महत्वाचे असल्याचे राहुल गांधी म्हणाले. सावरकरांनी इंग्रजांना मदत केली होती. सावरकरांचे हे पत्र देवेंद्र फडणवीस यांनी वाचावे, असे देखील राहुल गांधी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “…अशा मातृसंस्थांच्या पिल्लानी आम्हाला सावरकरांविषयी प्रश्न विचारू नये”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
- ICC Ranks | टी 20 मध्ये पुन्हा भारतीय संघ आघाडीवर, विश्वचषक जिंकून इंग्लंड भारताच्या मागे
- Shinde vs Thackeray | “आधी मातोश्री पवित्र करावी” ; शिंदे गटातील आमदाराचा घणाघात
- Sanjay Raut | “राजकीय स्वार्थासाठी इतर नेत्यांना भारतरत्न दिला, मग…”, संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक सवाल
- Alia-Ranbir Baby | आलिया-रणबीरच्या मुलीचे नाव ऐकून, आजी नीतू कपूर झाली भावूक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
