🕒 1 min read
औरंगाबाद : “रामदास स्वामींकडे तुम्ही आता जातीने बघणार आहात? रामदास स्वामी कधी म्हणाले होते का ते शिवाजी महाराजांचे गुरु आहेत म्हणून. गुरु शिष्याच्या नात्याचा कधी संबंध येत नाही. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांविषयी जे लिहिलं आहे त्याच्याइतके उत्कृष्ट लिहिलेल कुठंही वाचलेलं नाही.” असे म्हणत राज ठाकरे यांनी रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू आहेत की नाही, यावर आपले रोखठोक मत मांडले.
घोषणा केल्याप्रमाणे आज १ मे महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभेला सुरुवात झाली. ही सभा महाराष्ट्र सांस्कृतिक मैदानावर होणार असल्याने या सभेसाठी राज ठाकरे कालच औरंगाबादमध्ये दाखल झाले होते. आज सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, मुंबईला गुडीपाडव्या दिवशी सभा घेतली. त्या सभेनंतर बरेच लोक बडबडायला लागली. त्यांना उत्तर देण्यासाठी एक उत्तर सभा ठाण्यामध्ये घेतली. खरं तर दोनच सभा मी घेतल्या, पण या दोन सभांवरती किती बोलत आहेत.
जातीपातीच्या राजकारणामुळे महाराष्ट्र खितपत पडतोय. शरद पवारांना हिंदू या शब्दाची अलर्जी आहे. असेही राज ठाकरे म्हणाले. भाषणातील बहुतांश वेळ त्यांनी राष्ट्रवादीमुळे सुरू झालेले जातीपातीचे राजकारण यावर प्रहार करतांनाच राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्या संदर्भात चार तारखेनंतर ऐकणार नसल्याचा इशारा राज्य सरकारला दिला. गुडीपाडव्याच्या सभेत पहिल्यांदा राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्या उपस्थीत केला होता.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
