…जेव्हा कलेक्टर उदयन मिश्रा सरकारी शाळेतल्या वर्गात गुपचूप येऊन बसतात!

बिहार (कटिहार) : बिहारच्या कटिहार कुरसेला या जिल्ह्यातील दक्षिण मुरादपूर येथील एका सरकारी शाळेतील मुलांसाठी एक आश्चर्यचकित करणारा प्रसंग घडला आहे. बिहारच्या कटिहारचे जिल्हाधिकारी उदयन मिश्रा हे नेहमी आपल्या अनोख्या कामाने सर्वांना आश्चर्यचकित करत असतात. असाच आश्चर्याचा धक्का त्यांनी सरकारी शाळेतील चौथ्या वर्गातील मुलांना आणि शिक्षकांना दिला. ज्यावेळी वर्गात शिक्षक शिकवण्यात तल्लीन होते, तेव्हा ते गुपचूप जाऊन वर्गात बसले. शिक्षक फळ्यावर काहीतरी लिहीत असतानाच ते वर्गात जाऊन मागच्या बाकावर बसले. ज्यावेळी शिक्षकाने वळून शेवटी बसलेल्या व्यक्तीला पहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला.

हा प्रकार बिहारच्या कटिहार कुरसेला येथील अयोध्या प्रसाद विद्यालयातील आहे. जिल्हाधिकारी उदयन मिश्रा हे कटिहार मधील विविध विभागांची पाहणी करत होते. बुधवारी ते दक्षिण मुरादपूर येथील एका सरकारी शाळेत पोहचले. मग शांतपणे शाळेतल्या एका वर्गात मागच्या बँकेवर जाऊन बसले. त्यांनी मुलांना गप्प राहण्याचा इशारा केला होता. म्हणून मुलांनी दंगा केला नाही.

यावेळी मिश्रा यांनी मुलांना आणि शिक्षकांना आपली ओळख पटवून दिली. विद्यार्थी आणि शिक्षकांना आश्चर्य वाटले. यावेळी मिश्रा यांनी शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धतीचं कौतुक केले. मुलांना विचारलेल्या प्रश्नाची बरोबर उत्तरे मिळाल्याने, मिश्रा यांनी आनंद व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या :