Share

IPL 2022: अय्यरच्या नाईट रायडर्सना आज विल्यमसनचे सनरायझर्स भिडणार; वाचा कोणाचे असेल वर्चस्व!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: IPL 2022 च्या २५व्या सामन्यात आज ब्रेबॉर्न स्टेडियमवर ८ व्या स्थानावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादचा सामना दुसऱ्या क्रमांकाच्या कोलकाता नाइट रायडर्सशी होणार आहे. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील संघाने चेन्नई आणि गुजरात विरुद्ध बॅक टू बॅक विजय मिळविल्यामुळे सनरायझर्स हैदराबादला अखेर विजयाचे मार्ग मिळाले आहेत आणि KKR विरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी आज ते उत्सुक असतील.

कोलकाता विरुद्ध सामना होण्याआधी हैदराबादला (SRH vs KKR) मोठा धक्का लागला आहे. त्यांच्या गोलंदाजीचा कणा असलेला वॉशिंग्टन सुंदर (Washington sundar) हातच्या दुखापतीमुळे दोन सामने मुकण्याची शक्यता आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा आपल्या वेगवान गोलंदाजीने सगळ्यांना प्रभावित केलेल्या उमरान मलिककडे सगळ्यांचे लक्ष असेल. तर दुसरीकडे श्रेयसच्या कर्णधारपदात उत्तम कामगिरी करत असलेल्या नाईट रायडर्स पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठण्याचे प्रयत्न करताना दिसेल.

संभाव्य संघ :
सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (C ), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (wk), एडन मार्कराम, शशांक सिंग/अब्दुल समद, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅनसेन, टी नटराजन, उमरान मलिक

कोलकाता नाइट रायडर्स: अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (C), सॅम बिलिंग्ज (wk), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पॅट कमिन्स, रसिक सलाम, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!