Share

“स्वाभिमान विकून लाचारी पत्करलीत आणि साहेबांच्या पायाशी…”, अतुल भातखळकर यांचा गुलाबराव पाटलांना टोला

Published On: 

मुंबई: आपण नेहमीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध केला. मात्र शरद पवारांमुळे मला मंत्रिपद मिळालं. ही बाब अतिशय आश्‍चर्यकारक असल्याचे शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी म्हटले. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे.

“मी शरद पवार अन् राष्ट्रवादीला नेहमी विरोध केला; मात्र त्यांनीच मला मंत्री केलं इति शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील. स्वाभिमान विकून लाचारी पत्करलीत आणि साहेबांच्या पायाशी लोळण घेतलीत म्हणून ते मंत्रीपद मिळालं.”, असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

स्वतंत्रसेनानी आणि माजी आमदार स्व. मुरलीधर अण्णा पवार यांच्या धरणगाव तालुक्यातील चांडसर येथील पुतळ्याचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण झाले.यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी शरद पवारांचे तोंडभरून कौतुक केले. आपण नेहमीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध केला. मात्र शरद पवारांमुळे मला मंत्रिपद मिळालं. असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्र बदलणारा नेते आहे, असे म्हटले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!