विराट कोहली नंतर जो रूट याचा मोठा निर्णय; अचानक सोडले टेस्टचे नेतृत्व!

मुंबई: जानेवारी मध्ये विराट कोहलीने अचानक टेस्टचे कर्णधारपद सोडले होते. त्याचप्रमाणे नुकतेच इंग्लंडचा सर्वात यशस्वी कर्णधार जो रूटने टेस्टच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. ऑस्ट्रेलिया आणि कॅरिबियनच्या निराशाजनक दौऱ्यात खराब निकालांमुळे इंग्लंडच्या कसोटी कर्णधारपदावरून जो रूटने राजीनामा दिला आहे. गतवर्षी इंग्लडचा डाउन अंडरमध्ये ४-० असा पराभव झाल्यानंतर आणि त्यानंतर वेस्ट इंडिजमधील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी घसरण झाल्यानंतर संघाचा कर्णधार म्हणून रूटवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.

जो रूटने (joe root) कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ईसीबीने (ECB) एक निवेदन जारी केले आहे. ज्यात रुटने लिहले, “कॅरिबियन दौऱ्यावरून परतल्यानंतर आणि विचार करायला वेळ मिळाल्यानंतर मी इंग्लंड पुरुषांच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या कारकिर्दीतील हा सर्वात आव्हानात्मक निर्णय आहे, परंतु माझ्या कुटुंबाशी आणि माझ्या जवळच्या लोकांशी याबद्दल चर्चा केली आहे; मला माहित आहे की वेळ योग्य आहे.”

अॅलिस्टर कुकचा (Alastair cook) उत्तराधिकारी म्हणून २०१७ मध्ये पदभार स्वीकारल्यापासून, रूटने विक्रमी ६४ कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचे नेतृत्व केले. कर्णधार म्हणून २७ विजय आणि २६ पराभव असा विक्रम रूटने रचला. पणमागील १७ कसोटी सामन्यांपैकी त्याने फक्त एकच जिंकली,तसेच याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवरही होताना दिसला. ज्यामुळे रुटने अखेर पायउतार होण्याचा निर्णय घेतला.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या