मुंबई: आयपीएलमुळे भारतीय क्रिकेटमधील हजारो लपलेल्या रुस्तम खेळाडूंना ओळख मिळाली आहे. त्यातीलच एक डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल देखील आता आपल्या कौशल्याने जगात आपली छाप सोडण्यासाठी सज्ज झाला आहे. या मोसमात गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या यश दयालने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या कारकिर्दीतील पहिल्या IPL सामन्यात ३ विकेट घेत सर्वांची मने जिंकली आहेत.
कोण आहे यश दयाल?
उत्तर प्रदेशातून आलेल्या यश दयाल (Yash dayal) वयाच्या ८ व्या वर्षापासून क्रिकेट खेळायचा. क्रिकेटची ही आवड त्याच्या वडिलांकडून वारशाने मिळाली. त्याचे वडीलही वेगवान गोलंदाजी करायचे, पण कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना त्यांच्या स्वप्नांचे पंख छाटावे लागले. अनेक वर्षांनंतरही त्यांच्यातील क्रिकेटची आग शांत होत नसल्याने त्यांनी आपले स्वप्न मुलगा यशच्या डोळ्यांतून जगण्याचा निर्णय घेतला. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी यशने कोणतीही कसर सोडली नाही.
यश दयालने उत्तर प्रदेशसाठी १४ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ५० विकेट घेतल्या, त्यानंतर भारतीय स्थानिक क्रिकेटच्या सर्किटमध्ये त्यांचे नाव वेगाने पसरू लागले. यानंतर त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये ७ सामन्यात १५ विकेट घेत टीम इंडियाचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली. या वर्षी फेब्रुवारीमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतही यशची नेट गोलंदाज म्हणून निवड झाली होती.
IPL 2022 मेगा ऑक्शनमध्ये यश दयालचे नाव येताच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात बोली युद्ध सुरू झाले. दोन्ही फ्रँचायझींनी यशच्या नावावर जोरदार बोली लावायला सुरुवात केली आणि लवकरच २० लाख रुपयांच्या मूळ किंमतीच्या यशला गुजरात टायटन्सने ३.२ कोटींमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले होते.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- ‘The Kashmir Files’ चित्रपटात काश्मिरी पंडितांवरच हल्ला झाल्याचे एकतर्फी चित्र रंगविण्यात आले; राष्ट्रवादीचा आरोप
- IPL 2022 RR vs GT: अश्विनला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्या मागच्या मास्टर प्लॅनचा संजू सॅमसनने केला खुलासा!
- “लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र…”, किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंना टोला
- “मेरा आवाज हिंदुस्थान का आवाज…” कोर्टाबाहेर सदावर्तेंनी दिल्या घोषणा
- गुणरत्न सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी; सातारा जिल्हा न्यायालयाचा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

