Share

IPL 2022 RR vs GT: अश्विनला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्या मागच्या मास्टर प्लॅनचा संजू सॅमसन याने केला खुलासा!

Published On: 

मुंबई: राजस्थान रॉयल्सला नवीन IPL संघ गुजरात टायटन्सकडून पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानच्या चाहत्यांनी राजस्थान रॉयल्सच्या पराभवाचे श्रेय रविचंद्रन अश्विनच्या फलंदाजीला दिले. त्यानंतर आता संघाचा कर्णधार संजू सॅमसनने रविचंद्रन अश्विनच्या फलंदाजीच्या क्रमावर आपले मत मांडले आहे. अश्विनला तिसऱ्या क्रमांकावर का पाठवले हे त्याने आपल्या वक्तव्यात सांगितले आहे.

संजू सॅमसन (sanju samson) म्हणाला, “मी गेल्या काही वर्षांपासून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे पण संघासाठी मी चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासही तयार आहे. अश्विनसारखा (R ashwin) खेळाडू आम्हाला ते करू देतो. देवदत्त पडिक्कलने (devdutt padikkal) पहिल्या तीन सामन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. मेगा ऑक्शनपासून अश्विन किंवा देवदत्त यांना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्याची आमची योजना होती.”

राजस्थान रॉयल्सने (Rajasthan royals) नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यानंतर गुजरातने राजस्थानला १९३ धावांचे डोंगराएवढे लक्ष्य दिले होते. दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली. १९३ धावांचा पाठलाग करणाऱ्या राजस्थान संघाला जोस बटलरने धमाकेदार सुरुवात करून दिली. जोस बटलरने २४ चेंडूत ५४ धावांची स्फोटक खेळी खेळली. मात्र अशा सुरुवातीनंतरही राजस्थान रॉयल्सला २० षटकांत ९ गडी गमावून १५५ धावाच करता आल्या.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!