Share

‘The Kashmir Files’ चित्रपटात काश्मिरी पंडितांवरच हल्ला झाल्याचे एकतर्फी चित्र रंगविण्यात आले; राष्ट्रवादीचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘The Kashmir Files’ चित्रपट राजकारणात अजूनही चर्चेत आहे. हा चित्रपट म्हणजे काँग्रेस काळात काश्मिरी जनतेवर झालेला अन्याय, अत्याचार याचे ज्वलंत उदाहरण असल्याचे भाजपने म्हटले. तर राज्यातील मविआ नेते तसेच केंद्रातील विरोधी पक्षाने या चित्रपटात वास्तव दडवले असल्याचे म्हटले गेले. आता यावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते महेश तपासे यांनी प्रतिक्रिया देत टीका केली आहे.

‘काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया जोरात सुरु असताना काश्मिरी पंडितांसह मुस्लिम, शीख, बौद्ध व इतर समाज यांच्यावरही फार मोठे अत्याचार झाले आणि त्यांनाही आपली घरे सोडावी लागली. परंतु ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात फक्त काश्मिरी पंडितांवरच हल्ला झाल्याचे एकतर्फी चित्र रंगविण्यात आले आहे.”, असा आरोप महेश तपासे यांनी केला आहे.

यामागे भाजपचा काय राजकीय हेतू आहे हे आता भारतातल्या सबंध जनतेला समजलेले आहे. मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून काश्मिरी नागरिकांच्या पुनर्स्थापनेसाठी काश्मीर खोऱ्यामध्ये काय प्रयत्न केले हे देवेंद्र फडणवीसांनी सर्वांना सांगावे. असे आव्हानही महेश तपासे यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!