🕒 1 min read
रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं चिथावणीखोर विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंना महागात पडताना दिसत आहे. राणेंच्या विधानाप्रकरणी महाड आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. राणेंचं विधान गंभीर असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी दिलेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर चिपळून येथे माध्यमांशी संवाद साधताना राणेंनी आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांनाही खडेबोल सुनावले.
मी मुख्यमंत्र्यांवर बोललो की चिथावणीखोर विधान म्हटलं जातं. मग मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या विधानाचं काय, असा सवाल राणेंनी विचारला. ‘भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली. त्यावर थपडा लगावण्याची भाषा मुख्यमंत्र्यांनी केली. ते विधान चिथावणीखोर नव्हतं का?’
‘देशाचा स्वातंत्र्यदिन कितवा हे एखाद्या मुख्यमंत्र्यांला माहीत नाही ही गोष्ट गंभीर आहे. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव की हिरक महोत्सव ही गोष्ट मुख्यमंत्री सचिवांना विचारतात. हा देशाचा अपमान आहे. राष्ट्रद्रोह आहे. त्यावेळी तुम्ही कोठे होतात? असा सवाल त्यांनी पत्रकारांना विचारला.
‘मी जेव्हा शिवसेनेत होतो तेव्हाची शिवसेना वेगळी होती, मात्र मी शिवसेना सोडल्यापासून शिवसेना संपुष्टात जमा आहे. अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. दरम्यान यावेळी त्यांनी ‘मी काय नॉर्मल माणूस वाटतो का तुम्हाला, असा सवाल त्यांनी यावेळी माध्यमांना केला आहे. मी कॅबिनेट मंत्री आहे. मी कोणत्याही माहितीच्या आधारावर प्रतिक्रिया देणार नाहीये’. असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मी काय नॉर्मल माणूस वाटलो काय तुम्हाला’, राणेंची पहिली प्रतिक्रिया
- मुख्यमंत्र्यांचा अपमान हा त्यांचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे – राष्ट्रवादी
- राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप मध्ये वाद पेटला, नाशिकच्या भाजपा कार्यालयाची तोडफोड
- ‘खऱ्या आईचं दूध पिलं असेल तर समोर या, तुमची औकात दाखवून देऊ’, निलेश राणेंचा इशारा
- पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेला तात्पुरती स्थगिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
