Share

मुख्यमंत्र्यांचा अपमान हा त्यांचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे – राष्ट्रवादी

Published On: 

मुंबई – नारायण राणे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा करण्यात आलेला अपमान हा मुख्यमंत्र्यांचा नाही तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे तो कदापि सहन केला जाणार नाही असे सांगतानाच कोण कितीही मोठा असला तरी कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्यानंतर नवाब मलिक यांनी राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे. नारायण राणे यांनी जी भाषा वापरली आहे ती अशोभनीय आहे. ही भाषा व हे राजकारण महाराष्ट्र कधी स्वीकारत नाही हे भाजपला कळले पाहिजे असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपकडून हिंसक राजकारण करण्यात आले. वातावरण बिघडवण्याचे काम करण्यात आले त्याचपध्दतीने भाजप महाराष्ट्रात हिंसक वातावरण निर्माण करण्याचे काम करत आहे मात्र महाराष्ट्रातील जनता हे स्वीकारणार नाही असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!