इस्लामाबाद : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात पुढील महिन्यात होणारी एकदिवसीय मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून या मालिकेबद्दल शंका होती. श्रीलंकेत खेळली जाणारी ही मालिका तूर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील प्रचलित परिस्थितीमुळे अफगाणिस्तान संघ प्रवास करू शकणार नाही, त्यामुळे ही मालिका पुढे ढकलावी लागली.
तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून पाकिस्तानविरुद्धची एकदिवसीय मालिका धोक्यात आली आहे. ही 3 सामन्यांची मालिका श्रीलंकेत होणार होती पण आता ती पुढे ढकलण्यात आली आहे. सोमवारी कळवण्यात आले की, हि मालिका श्रीलंकेऐवजी पाकिस्तानमध्ये होणार आहे. श्रीलंकेत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.
दरम्यान, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे कार्यकारी अधिकारी हमीद शनिवारी म्हणाले, “खेळाडूंचे मानसिक आरोग्य लक्षात घेता आम्ही पाकिस्तानविरुद्धची मालिका तात्पुरती पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.”
तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यामुळे काबूलमधून यावेळी कोणताही व्यावसायिक प्रवास शक्य नाही. अफगाणिस्तान संघ एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी दुबईमार्गे श्रीलंकेला रवाना होणार होता. तसेच टीमला पाकिस्तानला जायचे होते तेथून सर्व खेळाडूंना दुबईला जायचे होते. देशात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रवास करणे शक्य नव्हते आणि सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर अखेर मालिका पुढे ढकलण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्य सरकारने दहीहंडीला परवानगी नाकारल्यानंतर मुंबई महापालिकेने गणेशोत्सवाबाबत घेतला ‘हा’ निर्णय
- ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो पण त्यांनी भेट दिलीच नाही’; शेट्टींची जाहीर नाराजी
- ‘दहीहंडीसाठी कोरोनाचा बाऊ कशाला? ; दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे उभी राहणार’
- पुणे जिंकणार, कोरोना हरणार! आज नव्या कोरोना बाधितांची संख्या केवळ दोन आकडी
- ‘पर्यावरणाच्या दृष्टीने वाघ महत्वाचा असला तरी मानवाचा जीवसुध्दा महत्वाचाच’


