🕒 1 min read
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कानशिलात लगावणार असल्याचे तवक्तव्य राणे यांनी केले आहे. यावरूनच त्यांचे पुत्र निलेश राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना इशारा दिला आहे. ;शिवसेनेला वाटत असेल की, आम्हाला काही फरक पडेल मात्र त्यांनी लक्षात घावे की आम्हाला काडीभर फरक पडत नाही. असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.
दरम्यान निलेश राणे यांनी शिवसेनेला खऱ्या आईचं दूध पीलं असेल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ. असा इशारा शिवसेनेला दिला आहे. कुठेतरी बॅनर लावा आणि मीडिया वर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यानी लक्षात घ्यावं आम्हाला काडीभर फरक पडत नाही. असे प्रतिउत्तर निलेश राणे यांनी दिले आहे.
कुठेतरी बॅनर लावा आणि मीडिया वर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यानी लक्षात घ्यावं आम्हाला काडीभर फरक पडत नाही. खऱ्या आईचं दूध पियाला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 24, 2021
मंत्री राणे यांनी महाड येथे जनआशीर्वाद यात्रेदरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरेंबाबत खळबळजनक विधान केले आहे. महाराष्ट्रात यांच्यामुळे एक लाखा पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला, मात्र काही उपाय नाही. लस नाही, डॉक्टर नाहीत, वैद्यकीय कर्मचारी नाहीत. भयावह परिस्थिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची होती. यांना बोलायचा अधिका तरी आहे का? बाजूला एखाद सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक मोहत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे. सरकार कोण चालवतय ते कळत नाही, ड्रायव्हरच नाही. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे. असे विधान राणे यांनी केले होते. यावरूनच त्यांच्यावर नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्य सरकारने दहीहंडीला परवानगी नाकारल्यानंतर मुंबई महापालिकेने गणेशोत्सवाबाबत घेतला ‘हा’ निर्णय
- ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो पण त्यांनी भेट दिलीच नाही’; शेट्टींची जाहीर नाराजी
- ‘दहीहंडीसाठी कोरोनाचा बाऊ कशाला? ; दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे उभी राहणार’
- पुणे जिंकणार, कोरोना हरणार! आज नव्या कोरोना बाधितांची संख्या केवळ दोन आकडी
- पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेला तात्पुरती स्थगिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
