Share

“गडकरींची पंतप्रधान पदासाठी मागणी झाली तर फडणवीसांची भूमिका काय असेल” ; दिपाली सय्यद यांचा सवाल!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) फायरब्रॅन्ड नेत्या दीपाली सय्यद (Dipali Sayyad) या आपल्या सडेतोड व तडाखेबंद बोलण्यामुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. दीपाली सय्यद या शिवसेनेच्या विरोधकांना लक्ष्य करत असतात. शिवसेनेच्या वतीने आपली भूमिका मांडत असतात. आता दीपाली सय्यद यांनी थेट राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांच्यावर ट्विट वार केले आहे.

भाजप नेते पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विधान परिषद निवडणुकीत डावलण्यात आले, हाच धागा पकडत दीपाली सय्यद यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. सय्यद आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “फडणवीस साहेब पंकजाताईंच्या नावाची शिफारस करू शकला नसलात तरी नागपुरच्या धर्तीचे सुपूत्र माननीय नितिनजी गडकरी (Nitin Gadkari) साहेब यांची २०२४ च्या पंतप्रधान पदासाठी महाराष्ट्र भाजपाकडुन संघाकडे मागणी करायची झाली तर आपली भुमिका काय असेल तेही स्पष्ट करा. संघाची उत्पती नागपुरची मग नेतृत्व का नाही?”

दीपाली सय्यद यांनी नितीन गडकरी यांना पंतप्रधान म्हणून मागणी झाली तर आपली भूमिका काय असेल, ते स्पष्ट करा, असे आव्हान दीपाली सय्यद यांनी दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची व्युत्पत्ती जर नागपूची असेल तर मग पंतप्रधानपदी नागपूरचे नेतृत्व का नाही ? असा सवालही सय्यद यांनी उपस्थित केला.

महत्वाच्य बातम्या:

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!