🕒 1 min read
मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (२९ जून) फेसबुक लाईव्ह येत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राजकीय तसेच मनोरंजन क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्येच आता अभिनेता हेमंत ढोमे पाठोपाठ ‘बिग बॉस’ फेम अभिनेता आरोह वेलणकरने देखील एक ट्विट केलं आहे.
आरोह वेलणकरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. ट्विट करत आरोहने लिहिले की, “महाराष्ट्राची जनता जिंकली” हे ट्विट सध्या खूप व्हायरल होत आहे. याला काही लोक पाठिंबा दर्शवत आहेत तर काहीजण आरोहाला ट्रोल करत आहेत. हे ट्विट केल्यानंतर आरोहने आणखी एक ट्विट केलं. त्यामध्ये त्याने बऱ्याच वर्षांपूर्वीच्या वर्तमानपत्राचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, “जे साहेबांनी केलं तेच त्यांच्या सरकार सोबत झालं.” सध्या आरोहचे दोन्ही ट्विट खूप चर्चेचा विषय बनले आहेत. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
People of #Maharashtra have won! ????????
— Aroh Welankar (@ArohWelankar) June 29, 2022
Karma! जे साहेबांनी केलं तेच त्यांच्या सरकार सोबत झालं…???????? pic.twitter.com/qsDUdCNtOn
— Aroh Welankar (@ArohWelankar) June 29, 2022
दरम्यान, सोशल मिडीयावर अनेक भावून पोस्ट कालपासून पहावयास मिळत आहेत. तरुण पिढीकडून अनेक पोस्ट शेअर केल्या जात आहेत. ज्यात उद्धव ठाकरेंच्या बाजूने असलेला एक गट दिसून येत आहे. राजकारणातील या घडामोडी इतिहासात कायम स्मरणात ठेवल्या जातील. काल या सर्व घडामोडीनंतर भाजपकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. तर भाजपच्या अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार स्थापन होण्याचा दावाही केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
