मुंबई : २०२१चा टी-२० वर्ल्डकप टीम इंडियासाठी खूपच निराशाजनक होता आणि यावेळी संघ आगामी वर्ल्डकपच्या तयारीसाठी कोणतीही कसर सोडत नाहीये. भारताने नुकतीच आयर्लंडविरुद्धची टी-२० मालिका २-० अशी जिंकली. टीम इंडिया आता इंग्लंडशी भिडणार आहे. यादरम्यान, खेळल्या जाणाऱ्या टी-२० सामन्यांतील खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समितीचे बारकाईने लक्ष आहे. खेळाडूही चांगली कामगिरी करून टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तत्पूर्वी माध्यमांच्या वृत्तानुसार, टीमचा वरिष्ठ गोलंदाज मोहम्मद शमी वर्ल्डकपसाठी भारतीय टीमचा भाग नसेल.
एएनआयने एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले, की शमीची वर्ल्डकपसाठी निवड होणार नाही. शमी या फॉरमॅटसाठी तंदुरुस्त नसल्याने निवडकर्ते टी-२० विश्वचषकासाठी त्याच्याकडे पाहत नाहीत. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकापूर्वी निवडकर्त्यांना तरुणांमध्ये गुणवत्ता पाहायची आहे आणि त्यांना शक्य तितक्या संधी द्यायच्या आहेत. ते भुवनेश्वरला वरिष्ठ गोलंदाज म्हणून निवडू शकतात.
भारताला १ जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी खेळायची आहे, त्यात शमीची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात शमीच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. शमीने अलीकडेच आयपीएलमध्ये गुजरात टायटन्ससाठी चांगली कामगिरी केली. शमीचा आयपीएलमधील टॉप १० विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये समावेश होता. शमीने भारतासाठी आतापर्यंत १७ टी-२० सामने खेळले असून त्यात १८ बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

