🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज केएल राहुलची जर्मनीमध्ये शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यांनीच गुरुवारी याबाबत माहिती दिली. ३० वर्षीय राहुलने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो हसताना दिसत आहे. या छायाचित्रात राहुल बेडवर बसलेला दिसतो आणि त्याने पांढरा टी-शर्ट घातलेला आहे.
केएल राहुलच्या या पोस्टनुसार , त्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून तो बरा होत आहे. राहुलने इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘माझ्यासाठी काही आठवडे अतिशय कठीण होते पण ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. माझी रिकव्हरी सुरू झाली आहे आणि माझी प्रकृती चांगली आहे. तुमच्या प्रतिक्रीया आणि प्रार्थनांबद्दल धन्यवाद. लवकरच भेटू.’
केएल राहुलच्या या पोस्टवर हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेसह अनेकांनी कमेंट केल्या आहेत. यावर हार्दिकने हार्ट इमोजी शेअर केला आहे. त्याचवेळी सूर्यकुमारने ‘लवकर बरा हो’ असे लिहिले. या पोस्टवर रितिकाने बॉडी बिल्डिंग इमोजी शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CfZcaDGqny_/?igshid=YmMyMTA2M2Y=
राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळणार होता. परंतु मालिका सुरू होण्याच्या अगोदर तो कंबरेच्या दुखापतीला बळी पडला. याच कारणामुळे त्याला मालिकेतून बाहेर पडावे लागले होते. यानंतर दुखापतीतून न सावरल्यामुळे तो आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतही सहभागी होऊ शकला नाही.
राहुलच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत ऋषभ पंतने भारतीय संघाची धुरा सांभाळली. त्याचवेळी अष्टपैलू हार्दिक पंड्याकडे आयर्लंडविरुद्धच्या २ सामन्यांच्या टी-२० मालिकेत कर्णधारपद सोपवण्यात आले होते. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली. त्यानंतर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने आयर्लंडविरुद्ध २-० असा विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
