औरंगाबाद : उद्धव ठाकरेंच्या सभेची शिवसैनिकांकडून गेली कित्येक महिन्यापासून जोरदार तयारी सुरु आहे. आता तो दिवस आला आहे. आज औरंगाबाद शहरात 8 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. विशेष म्हणजे सभेपूर्वीच आणखी एक टीझर जारी करण्यात आला आहे. यामध्ये शिवसैनिकांनी पुन्हा एकदा औरंगाबादच्या नामांतराचा उल्लेख केला आहे.
राज ठाकरेंची औरंगाबाद येथील सभा महाराष्ट्र सांस्कृतिक मैदानावर १ मे रोजी पार पडली होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा देखील आज ८ जून रोजी याच मैदानावर होणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा याच मैदानावर आणेल सभा कधीकाळी घेतल्या होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सभेलाही भव्य सभा म्हणून पहिले जात आहे. तसेच आजच्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आणखी एक टीझर जारी करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरें यांच्या सभेपूर्वी शिवसेना नेत्यांनी आतापर्यंत अनेक टीझर जारी करण्यात आले आहेत. आता शिवसेना नेत्यांनी सभेच्या अगोदर आणखी एक टीझर जारी केला आहे. या टीझरमध्ये बाळासाहेबांनी औरंगाबादच्या नामांतराची केलेली मागणीचे भाषण दाखवण्यात आले आहे. सोबतच, “लाखोचा भगवा गजर, आपलं संभाजीनगर…सिंहगर्जना घुमणार खरे हिंदुत्व काय? हे संभाजीनगर सांगणार, भगवी पताका फडकणार हिंदुत्वाचाझेंडा उंच राहणार, प्रखर हिंदुत्वासाठी भगव्या एल्गारासाठी हिंदुत्वाचा नारा दुमदुमणार सर्वत्र भगवे वादळ घुमणार, शिवबंधन दृढ राहणार हिंदुत्व चेतवणार,हिंदुत्वाचा गजर चलो संभाजीनगर…” असे टीझरमध्ये म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

