मुंबई : आम्ही इलाहाबादचं प्रयागराज आम्ही करुन दाखवल. उस्मानाबाद, औरंगाबदच काय?, असा प्रश्न विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परितषदेत उपस्थित केला होता. यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोचक सवाल केला आहे.
फडणवीसांच्या या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “आपणही पाच वर्षे मुख्यमंत्री होता. तेव्हा औरंगजेबाला कवटाळून बसला होता का? एखाद्या शहराचे नाव बदलायचं असेल तर केंद्र सरकारची परवाणगी लागते. राज्य सरकार यासाठी प्रयत्न करत आहे पण केंद्राने याला का मंजूरी दिली नाही. हे विचारावं लागेल. जसं योगींनी प्रयागराज करून घेतले तसे देवेंद्र फडणवीसांनी औरंगाबादच संभाजीनगर का करुन घेतलं नाही?, हा मोठा प्रश्न आहे.”
बाळासाहेब ठाकरेंची साक्ष
राम जन्मभूमी आंदोलनामध्ये फक्त भाजपचा सहभाग होता शिवसेनेचा नव्हता, या देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, “कोणी काहीही म्हटलं तरी इतिहास आहे, दस्ताऐवज आहे. साक्षी पुरावे आहेत. बाळासाहेब ठाकरेंची साक्ष आहे. शिवसेना नेत्यांना त्यामध्ये गुन्हेगार केलं होतं. शेकडो कारसेवक मुंबईतून गेले. त्याला कोणताही राजकीय पक्ष त्यावेळी नव्हता. त्या काळातला सामना पाहिला तर कारसेवकांची यादी आम्ही दिली आहे.”
भाजपच्या जन्म तारखेचा दाखला फडणवीसांनी आणावा
संजय राऊत म्हणाले, “भाजपच्या जन्म तारखेचा दाखला देवेंद्र फडणवीसांनी आणावा. जनता पक्षाचे पतन झाल्यावर १९८० च्या दशकात भाजपचा जन्म झाला आहे. तर शिवसेनेचा जन्म हा १९६९ साली झाला. शिवसेनेचा पहीले महापौर मुंबईमध्ये डॉ हेमचंद्र गुप्ते हे कधी झाले. त्यावेळी आमचे किती नगरसेवक निवडून आले होते. या संदर्भातील एक अभ्यास शिबीर आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठाणमध्ये ठेऊ. कोणाला त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर ते येऊ शकतात. शिवसेनेते पहिले आमदार वामनरान महाडिक देखील त्याच काळात निवडणून आले. भाजपच्या जन्माआधी आमचे वाघ मुंबईतून निवडून आलेले आहेत. देवेंद्र फडणवीसांचा तेव्हा मुंबईशी, महाराष्ट्राच्या राजकारणाशी सबंध नसेल कारण या सर्व गोष्टी फडणवीस यांच्या जन्माआधीच्या आहेत.”
महत्वाच्या बातम्या:
- गावगुंड नाना पटोले यांनी औरंगाबादेत येऊन दाखवावे त्यांचे कपडे फाडू; भाजपकडून पटोलेंविरोधात आंदोलन!
- “राम मंदिराच्या लढ्यात सगळ्या केसेस शिवसैनिकांनी अंगावर घेतल्या”, भाजपच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर
- शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह; पंतप्रधान नरेंद्र मोदी फोन करत म्हणाले….
- कॉमेडीयन भारती सिंहने घेतले सलमानकडून आश्वासन म्हणाली, “आमच्या बाळाला लाँच कराल का?”
- “२५ वर्ष युतीत राहुन आमचंही नुकसानच”, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

