Share

शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह; पंतप्रधान नरेंद्र मोदी फोन करत म्हणाले….

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (NCP President Sharad Pawar Corona Positive) यांना कोरोनाची लागण झाली असून शरद पवारांनी स्वतः ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. त्याचबरोबर आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना खबरदारी घेण्याचे आणि चाचणी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत विचारणा केली. खुद्द शरद पवार यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी मला फोन करून माझ्या प्रकृतीबद्दल विचारले. त्यांची काळजी आणि शुभेच्छांबद्दल मी कृतज्ञ आहे.”

दरम्यान, कोरोना झालेचे निष्पन्न होताच ‘माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की, त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी’,असे ट्वीट शरद पवारांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!