मुंबई : टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ शो (Bigg Boss) हा लोकप्रिय शोपैकी एक आहे. सध्या बिग बॉस १५ वे पर्व सुरु आहे. नुकतंच बिग बॉसच्या ‘विकेंड का वार’ मध्ये कॉमेडियन भारती सिंह (Comedian Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (husband Harsh Limbachia) यांनी हजेरी लावली. या एपिसोडमध्ये खूप धमाल मस्ती पहायला मिळाले असून यावेळी भारतीने असं काही बोलली की, सर्वांचे लक्ष वेधले आहे.
दरम्यान कॉमेडियन भारती सिंह ही प्रेग्नंट आहे. नुकतंच ती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांनी बिग बॉसमध्ये हजेरी लावली. यानिमित्ताने ते दोघेही मिठाई घेऊन या बिग बॉसच्या सेटवर पोहोचले होते. यावेळी सलमान खानने (Salman Khan) त्या दोघांचे अभिनंदन केले. यानंतर भारती सलमानला सांगते, ‘सर करण जोहरने आमच्या मुलाला सिनेसृष्टीत लाँच करण्यास नकार दिला आहे, तर तुम्ही आमच्या बाळाला लाँच कराल का?’ (Will you launch our baby?) त्यावर सलमान म्हणतो, ‘हो नक्कीच मी तुमच्या बाळाला लाँच करेन.’
https://www.instagram.com/p/CZCI4V7IcYI/?utm_source=ig_web_copy_link
त्यानंतर भारती सलमानला विचारते की, ‘सलमान सर आम्हाला तुमचे फार्महाऊसही बेबी शॉवरसाठी द्याल का?’ सलमान खान होकार देतो. यानंतर भारती हर्षला म्हणते, ‘हे बघ, मी म्हणाली होती ना की आपण सलमान सरांना मिठाई खायला देऊया, ते आपल्यासाठी सर्वकाही करतील.’ हा विनोद ऐकून सलमान खानसह उपिस्थित सर्वजण हसू लागतात. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया लवकरच आई-वडील होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
-
“नाना पटोलेंच्या डोक्यावर परिणाम”; देवेंद्र फडणवीसांनी लगावाला टोला
-
“मुख्यमंत्री ठाकरे काल जनतेसमोर आले अन् विरोधकांचे धाबे दणाणले”
-
“हिंदुत्वावर व्याख्यान देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे”, रामदास कदमांची खोचक टीका

