🕒 1 min read
मुंबई: विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त काल (२३ जानेवारी) उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणाचा जोरदार समाचार घेतला. ‘राम मंदिराबाबत तुम्ही बोलता, पण राम मंदिर आंदोलनाच्या वेळी तुम्ही कुठे होता? लाठ्याकाठ्या आम्ही खाल्ल्या, तुम्ही त्यावेळी तोंडाच्या वाफा दडवत होता.’ अशी टीका फडणवीस यांनी केली होती. आता या टीकेलाच शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अयोध्येच्या राम मंदिर आंदोलनात शिवेसेनेची भूमिका काय हे सर्वांना माहिती आहे. रामलल्ला प्रकरणी शिवसेनेची भूमिका ऐतिहासिक अशीच आहे. ज्यावेळी राम मंदिराचा मुद्दा थंड पडला होता त्यावेळी शिवसेनेने तो मुद्दा उचलला. अनेक शिवसैनिकांनी केसेस अंगावर घेतल्या. त्यामुळे आयोध्येशी शिवसेनेचा काय संबंध आहे हे रामाला माहिती आहे .असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच राम मंदिराच्या लढ्यात फक्त शिवसैनिक पुढे होता. त्यावेळी सगळ्या केसेस शिवसैनिकांनी अंगावर घेतल्या. “मुंबईत ज्यावेळी दंगल झाली होती त्यावेळी शिवसेनेने मुंबईला वाचवलं होतं, शेकडो शिवसैनिकांनी आपल्या अंगावर केसेस घेतल्या होत्या. त्यावेळी भाजप कुठे होतं?” असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राम मंदिराचे श्रेय हे मोदींचं नसून सर्वोच्च न्यायालयाचं असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह; पंतप्रधान नरेंद्र मोदी फोन करत म्हणाले….
- कॉमेडीयन भारती सिंहने घेतले सलमानकडून आश्वासन म्हणाली, “आमच्या बाळाला लाँच कराल का?”
- “२५ वर्ष युतीत राहुन आमचंही नुकसानच”, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवर निशाणा
- “भाजपच्या जन्माआधी शिवसेनेचे वाघ…”; संजय राऊतांच देवेंद्र फडणवीसांना सडेतोड उत्तर
- शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह; धनंजय मुंडे म्हणाले, “फिर भी आपको लढना है, क्योंकी..”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
