Share

“२५ वर्ष युतीत राहुन आमचंही नुकसानच”, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त काल शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २५ वर्षे युतीत राहून आम्ही सडलो अशी टीका भाजपवर केली होती. यावरच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी २५ वर्ष युतीत राहुन आमचंही नुकसानच झाले असल्याचे म्हटले आहे.

“युतीत २५वर्ष राहून आमचंही नुकसान झालं. २०१४ साली वेगळं लढल्यानंतर आमच्या १२२ जागा आल्या. तेव्हा आम्हाला कळलं. मुंबई महापालिकेत ८२ जागा आल्या. त्यावेळी जर अमित शाह यांनी ठरवले असते तर, भाजपचा महापौर झाला असता. तिथे तर केवळ दोनच जागा तुमच्यापेक्षा कमी होत्या.” अशी प्रतिक्रिया देत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान उध्दव ठाकरे यांनी हिंदुत्वावरूनही भाजपला चांगलेच धारेवर धरले. भाजपने सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर केला. सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर करणे म्हणजे हिंदुत्व नाही. भाजपने आमच्याकडून गुलामांसारखे वागण्याची आस ठेवली. मात्र आम्ही झुकलो नाही. आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीशी युती केली. त्यामुळे आम्ही भाजप सोडला पण हिंदुत्व सोडणार नाही. भाजप हे हिंदुत्व नाही. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!