Share

गावगुंड नाना पटोले यांनी औरंगाबादेत येऊन दाखवावे त्यांचे कपडे फाडू; भाजपकडून पटोलेंविरोधात आंदोलन!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे वादग्रस्त विधान करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. जाणीवपूर्वक ते वादग्रस्त विधाने करतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात त्यांना जीविताला धोका होईल या पद्धतीने त्यांनी धमकी दिली, त्यामुळे नाना पटोले यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर(Sanjay Kenekar) यांनी केली. गावगुंड नाना पटोले यांनी औरंगाबादेत येऊन दाखवावे त्यांचे कपडे फाडू असा इशारा संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.

गावगुंड नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. तेव्हा पासून महाराष्ट्र मधील काँग्रेस ही अधोगतीला जात आहे. त्यांच्या नेतृत्वात झालेल्या सर्व निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारून पराभव झाला. त्यामुळे जनतेने नाकारलेल्या काँग्रेस पक्षाचे नेते, स्वतःचे अपयश झाकण्या साठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मानसिक संतुलन बिघडल्या सारखे सतत गरळ ओकत असतात. त्यांच्या विरोधात भाजपच्यावतीने सिडको बसस्थानक चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली.

यावेळी कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करून पुंडलिक नगर येथील पोलीस चौकी मध्ये स्थानबद्द केले. यावेळी कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांचे करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, या सारख्या घोषणा देऊन, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विरोधात तीव्र निदर्शने केली. या वेळी ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस बापू घडामोडे, जिल्हा सरचिटणीस राजेश मेहता, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष राज वानखेडे आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!