Share

“जात पात धर्म हे आमच्या अंगाला…” ; धनंजय मुंडेंनी केली अमोल मिटकरींची पाठराखण

Published On: 

🕒 1 min read

बीड : अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय. पुण्यात ब्राह्मण संघटना आक्रमक झाल्या आहेत. इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा पार पडली. यावेळी सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे सह भाजप नेत्यांच्या सडकून टिका केली आहे. तसेच राज ठाकरे यांचा खाज ठाकरे असा उल्लेख केला. त्यानंतर मनसेने त्यांच्यावर टीका केली होती. दरम्यान, या सभेत मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबाबत केले वक्यव्यावरुन देखील चांगलाच राडा सुरु आहे. या वक्तव्यावर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.

“मिटकरी यांनी केलेले वक्तव्य हे एका लग्नाच्या संदर्भात होते. यात कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर ते खेदजनक आहे. मिटकरी यांचं ते व्यक्तिगत भाष्य होतं. राष्ट्रवादी म्हणून तो विषय बोलले नव्हते. त्यांनी त्यांचा एक स्वतःचा अनुभव सांगितला” असं म्हणत मुंडे यांनी मिटकरी यांची पाठराखण केली आहे.

दरम्यान जात पात धर्म हे आमच्या अंगाला देखील शिवले नाही. ते जे बोलले ते वैयक्तिक बोलले, अमोल मिटकरी याबाबत स्वतः स्पष्टीकरण देतील, असं धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये सांगितले आहे.

पुण्यात ब्राम्हण महासंघ आणि राष्ट्रवादी भिडले

ब्राम्हण संघाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींच्या वक्तव्याचा विरोध करण्यात येत असून मिटकरींनी भाषणात लग्नविधी बाबत चुकीचा मंत्र सांगितला असं म्हटलं. यावरून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर ब्राह्मण महासंघाने जोरदार आंदोलन केलंय. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस आणि ब्राम्हण महासंघाच्या कार्यकर्त्यांत जोरदार झटापट झाल्याचं पाहायला मिळालं. ब्राम्हण महासंघाचे कार्यकर्ते गुरुजींच्या वेशात आले होते. यावेळी त्यांनी कार्यालयाच्या बाहेर शांतीपाठ करत असल्याचं दिसतं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि यातूनच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद जाहीर सभेत ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची आपल्या भाषणात खिल्ली उडवली असल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाकडून करण्यात येतोय. अमोल मिटकरींनी विविध मंत्रोच्चार जसे की हनुमान स्तोत्र, कन्यादान विधी आदींचे मंत्र उच्चारून खिल्ली उडवली, त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आपले हास्य आवरले नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!