Share

“… तर त्यांना थोडी सुबुद्धी येईल”, ‘त्या’ वक्तव्यावरून फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

Published On: 

🕒 1 min read

नागपूर: शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना वाढवायची असेल तर नागपुरात घट्ट पाय रोवले पाहिजेत असे म्हटले. यावरच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी प्रतिक्रिया देत टोला लगावला आहे.

‘नागपूरच्या मातीमध्ये एक वेगळेपण आहे. ते नागपूरला वारंवार आले, तर त्यांना थोडी सुबुद्धी येईल”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. तसेच काल अवघ्या १२ तासांत काही अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या यावर फडणवीस म्हणाले की, आदेश परत घेण्यामागे नेमकं काय कारण आहे? की प्रशासकीय चूक आहे याचा खुलासा झाला पाहिजे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

नागपूर महानगर पालिका निवडणुक संदर्भात पक्षाची बांधणी करण्यासाठी आपण नागपुरात आल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. जर शिवसेना वाढवायची असेल तर नागपुरात घट्ट पाय रोवले पाहिजेत. नागपूर उपराजधानी आहे, हिंदुत्वाचा गड आहे आणि एकेकाळी शिवसेनेची ताकद येथे चांगली होती. आमच्यासारखे नेते येतात तेव्हा लोक जमतात, अनेक मान्यवर येतात. या सर्वांना पक्षासोबत काम करण्याची इच्छा आहे. त्याला कसा आकार देता येईल ते बघू. असे संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!