Share

IPL 2022 MI vs CSK : मॅचपूर्वी चेन्नईच्या ‘स्टार’ खेळाडूनं सोडलं मैदान; ‘या’ कारणामुळं परतला मायदेशी!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज चेन्नई-मुंबई (MI vs CSK) सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे (devon conway) बायो-बबलमधून बाहेर पडला आहे. कॉनवे लग्नासाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला कॉनवे न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. आयपीएलच्या १५व्या हंगामात त्याने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे.

ESPNcric Infoच्या अहवालानुसार, हा कॉनवे २४ एप्रिल रोजी चेन्नई संघात पुन्हा सामील होईल. मात्र, कोरोना प्रोटोकॉलनुसार दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर त्याला तीन दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. अशा स्थितीत हा डावखुरा फलंदाज दोन सामन्यांतून बाहेर असेल. गतविजेत्या चेन्नईचा सामना आज २१ एप्रिलला (गुरुवार) मुंबई इंडियन्सशी होईल तर २५ एप्रिलला पंजाब किंग्जशी होईल.

कॉनवे दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने बायो बबलमध्ये विवाहपूर्व पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत चेन्नईचे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ उपस्थित होता. आयपीएल २०२२ मेगा लिलावात कॉनवेला चेन्नई सुपर किंग्जने १ कोटी रुपयांना विकत घेतले होते.

पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यानंतर चेन्नईला दीर्घ विश्रांती मिळणार आहे. त्यानंतर रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील संघ १ मे रोजी सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. यंदाच्या मोसमात गतविजेतेपद वाचवण्यासाठी चेन्नई संघ मैदानात उतरला आहे. मात्र, त्यांची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. सीएसकेने पहिल्या सहा सामन्यांपैकी पाच गमावले आहेत, तर एक सामना जिंकला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!