🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा ३३वा सामना खूपच जबरदस्त होणार आहे, कारण स्पर्धेतील दोन यशस्वी संघ आज भिडणार आहेत. एल क्लासिको असे म्हटले जाणाऱ्या सामन्यात रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघ रवींद्र जडेजाच्या चेन्नई सुपर किंग्जशी (MI vs CSK) नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर भिडणार आहे. प्रत्येक आयपीएल हंगामात चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहतात.
चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात नेहमीच जोरदार टक्कर राहिली आहे. दोन्ही संघांकडे एकूण ९ आयपीएल ट्रॉफी आहेत. चेन्नई सुपर किंग्सने ४ वेळा आयपीएल आणि मुंबई इंडियन्सने ५ वेळा विजेतेपद पटकावले आहे. दोन्ही संघांना एकमेकांविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत जिंकायचे आहे. यंदाच्या हंगामात दोन्ही संघांची सुरुवात खराब झाली आहे. मुंबई इंडियन्सने ६ सामन्यांत सलग ६ पराभव पत्करले आहेत, तर चेन्नईने ६ पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे.
EL – Classico of IPL #CSKvsMi ????????@ImRo45 @msdhoni pic.twitter.com/SX4tfGxWVd
— Raj (@PremRaj184) April 21, 2022
मुंबई इंडियन्स संघ हेड टू हेड रेकॉर्डमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या पुढे आहे. त्यांनी १९ तर सीएसकेने १३ सामने जिंकले आहेत. महेंद्रसिंह धोनी हा मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे, ३७ सामन्यांत धोनीने ६८२ धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने चेन्नईविरुद्ध सात अर्धशतके झळकावली आहेत. जसप्रीत बुमराहने चेन्नईविरुद्ध मुंबई इंडियन्ससाठी १२ सामन्यांत ११ विकेट घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
