Share

IPL 2022 : रक्तातच क्रिकेट..! अर्जुन तेंडुलकरच्या भेदक ‘यॉर्कर’वर इशान किशन क्लीन बोल्ड; पाहा VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar)चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो आयपीएल २०२२ (IPL 2022) स्पर्धेत सराव करताना दिसत आहे. सराव सत्रादरम्यान त्याने मुंबई इंडियन्स (mumbai indians) संघाचा स्टार फलंदाज इशान किशनला सुंदर यॉर्करवर बोल्ड केले. याआधी तो या आयपीएलमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा होती. अर्जुन गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघाशी जोडला गेला आहे. यावेळीही आयपीएल लिलावात फ्रेंचायझीने त्याला ३० लाख रुपयांना विकत घेतले.

आज २१ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. हा सामना मुंबईसाठी खूप महत्त्वाचा आहे. या सामन्यात रोहितचा संघ पराभूत झाला तर त्याची प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची आशा संपुष्टात येईल. करा किंवा मरो या सामन्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईचा संघ गेल्या काही दिवसांपासून जोरदार सराव करत आहे. सरावादरम्यान अर्जुन तेंडुलकरने इशान किशनला त्याच्या अचूक यॉर्करवर क्लीन बोल्ड केले.

https://www.instagram.com/p/CclBS3VjjAd/

अर्जुन तेंडुलकरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. आयपीएल २०२२च्या लिलावात सर्वात महाग विकला गेलेला इशान किशन अर्जुनच्या या शानदार यॉर्करसमोर हतबल दिसला. अर्जुनचा हा उत्कृष्ट यॉर्कर पाहून क्रिकेट चाहत्यांनी त्याला मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली.

यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. १५व्या मोसमात त्यांनी आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत, ज्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. गुणतालिकेत मुंबई इंडियन्स दहाव्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!