Share

“आम्ही आमच्या बाजूने गॅसच्या किंमती कमी केल्या मात्र केंद्राने…”, अजित पवारांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: केंद्राने गॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझेलच्या किमती भरमसाठ वाढवल्या. आम्ही आमच्या बाजूने गॅसच्या किंमती कमी करण्याचा प्रयत्न केला. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करून सदर किमती कमी व्हाव्यात आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहोत.अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.

तसेच कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेड, एसटी कामगारांचा प्रश्न, ओबीसी आरक्षण या संदर्भात देखील अजित पवारांनी भाष्य केले. न्यायालयाशी संबंधित असलेल्या विषयांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न करु, असे ते म्हणाले. आमदारांच्या निधी प्रश्नावर ते म्हणाले की, कोरोना प्रादुर्भावामुळे निधी वाटपास मर्यादा होत्या. आहे त्या निधीतून राज्याच्या विकासाला खिळ बसू द्यायची नव्हती. मात्र आम्ही जे जे करता येईल ते केले. कुठल्याही विकास निधींमध्ये आम्ही घट केली नाही.

यावर्षी आपण रस्ते व विकास महामंडळाला विक्रमी असा २१ हजार कोटींचा निधी दिला. राज्यामध्ये कुठलाही नवीन कर लावलेला नाही. उलट गॅस सिलिंडरसंदर्भात १००० कोटींचा टॅक्स आम्ही माफ केला, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच गुढीपाडव्यापासून मुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण राज्यातील कोरोनाचे निर्बंध हटवले. त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सुरू केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही जनता दरबार, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी असे कार्यक्रम सुरू केले असल्याचे पवारांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022 : एक ओव्हर आणि ३५ रन्स..! मुंबईच्या गोलंदाजाला कमिन्सनं धुतलं; पाहा तुफानी बॅटिंगचा VIDEO!

सत्ताधाऱ्यांना सणसणीत उत्तर देण्यासाठी राज ठाकरेंची होणार ‘उत्तर’सभा

शहरप्रमुख पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले “आरे मी तर कधी पासूनच…”

IPL 2022 : सेहवागनं रोहित शर्माला म्हटलं वडापाव? वीरूच्या ‘त्या’ ट्वीटवरून मुंबईकर पेटले!

वसंत मोरेंची पदावरून हकालपट्टी, साईनाथ बाबरांकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!