पुणे : मनसेचे नेते वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटविण्यात आले असल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पुणे मनसे पदाधिकाऱ्यांची चर्चा होत आहे, या दरम्यानच मोरेंना पदावरून हटविण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला आहे.
आता वसंत मोरे यांना हटवून पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे देण्यात आलेली आहे. याबाबत मनसेने अधिकृत पत्र देखील जाहीर केले. शहरप्रमुख पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरेंनी फेसबुक पोस्टद्वारे पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
म्हणाले, “आरे मी तर कधी पासूनच तुझा मावळा आहे”. कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड. खुप खुप अभिनंदन साई. अशी फेसबुक पोस्ट त्यांनी केली.
महत्वाच्या बातम्या –


