पुणे : आयपीएल २०२२चा १४ वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात केकेआरने ५ गडी राखून विजय मिळवला. पुण्याच्या एमसीएस स्टेडियमवर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ४ बाद १६१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरच्या संघाने १६व्या षटकात लक्ष्य गाठले. पॅट कमिन्सने कोलकाताला सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने डॅनियल सॅम्सच्या षटकात फलंदाजी करताना ३५ धावा केल्या.
कोलकात्याच्या डावाचे १५वे षटक संपले तेव्हा केकेआरला सामना जिंकण्यासाठी ३० चेंडूत ३५ धावांची गरज होती. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्माने डॅनियल सॅम्सकडे चेंडू सोपवला आणि त्याच्यासमोर पॅट कमिन्स होता. कमिन्स १६व्या षटकातच सामना संपवेल असे क्वचितच कोणाला वाटले असेल. यादरम्यान त्याने असे केले जे आयपीएलच्या इतिहासात फार कमी घडले आहे. कमिन्सने सॅम्सच्या षटकात फलंदाजी करताना ४ षटकारांसह २ चौकारही मारले. सॅम्सचा पाचवा चेंडू नो बॉल होता ज्यावर २ धावा आल्या. अशाप्रकारे आक्रमक फलंदाजी करताना केकेआरने १६व्या षटकात सामना जिंकला.
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासावर नजर टाकली, तर एका षटकात सर्वाधिक धावा देणारा डॅनियल सॅम्स हा जगातील तिसरा गोलंदाज आहे. आयपीएल २०११ मध्ये कोची टस्कर्स केरळचा गोलंदाज पी परमेश्वरनने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळताना एका षटकात ३७ धावा दिल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
- शहरप्रमुख पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले “आरे मी तर कधी पासूनच…”
- IPL 2022 : सेहवागनं रोहित शर्माला म्हटलं वडापाव? वीरूच्या ‘त्या’ ट्वीटवरून मुंबईकर पेटले!
- वसंत मोरेंची पदावरून हकालपट्टी, साईनाथ बाबरांकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी
- “जनतेने मतं देऊन त्यांची जबाबदारी पूर्ण केली आता आपल्याला…”, अजित पवारांचे मोठे वक्तव्य
- “राज ठाकरेंवर नाराज नाही, मात्र बेचैन आहे” – वसंत मोरे
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com


