Share

सत्ताधाऱ्यांना सणसणीत उत्तर देण्यासाठी राज ठाकरेंची होणार ‘उत्तर’सभा

Published On: 

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर सध्या किणी प्रकरणावरून निशाणा साधला जात आहे. यंदाच्या पाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी भाजपचे कौतुक करत अनेक मोठे खुलासे केले. मात्र सत्ताधारी पक्षाकडून त्यांना ‘किणी फाईल’ वरून टार्गेट केले जात आहे. तसेच राज ठाकरे यांची बदलती भूमिका बद्दलही त्यांच्यावर टीका केली जात आहे.

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका करणाऱ्या राज्यातील सत्ताधाऱ्यांचे ढोंग उघडकीस आणून त्यांना सणसणीत आणि खणखणीत ‘उत्तर’ देण्यासाठी राज ठाकरे यांची ‘उत्तर’सभा ९ एप्रिलरोजी सायंकाळी साडे सहा वाजता ठाण्यात होणार आहे. याबाबत मनसेनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

राज ठाकरे यांनी पाडव्याच्या भाषणात म्हटले होते की, माझी पंतप्रधानांना विनंती आहे. ईडीच्या, आयकरच्या धाडी टाकत आहात ना आमच्या पोलिसांना विचारा, त्यांच्याकडे सोर्स आहे. झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांमध्ये एकदा धाडी टाका. तुम्हाला काय काय हाताला लागेल, ते कळेल. आपल्याला पाकिस्तानची गरजच नाही. कशाला हवाय पाकिस्तान? उद्या जर काही घडलं, तर आतलं आवरता आवरता नाकीनऊ येतील इतक्या गोष्टी आतमध्ये भरलेल्या आहेत. आमचं लक्ष नाहीये. आम्हाला मतं हवीत. आम्हीच त्या झोपडपट्ट्या, मदरसे वाढवत आहोत. असे म्हणत त्यांनी मशिदी समोर हनुमान चालीसा वाजवणारे भोंगे लावण्याचे आदेश मनसे कार्यकर्त्यांना दिले होते. यावरून मविआ नेत्यांनी त्यांच्यावर टीकेचा बाण सोडला. आता ‘उत्तर’ सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या:

“राज ठाकरेंवर नाराज नाही, मात्र बेचैन आहे” – वसंत मोरे

काय आहे किणी खून प्रकरण? ज्यावरुन राज ठाकरेंना आजही केलं जातेय टार्गेट

अजित पवारांच्या उपस्थितीत अभिनेत्री आसावरी जोशी आणि स्वागता शाह यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

नगरसेवक वसंत मोरेंचा मनसेला रामराम? पक्षाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट!

IPL 2022 : सूर्य कुणीकडं उगवला..! दीपक हुडानं कृणाल पंड्याला म्हटलं ‘भाऊ’; वाचा सविस्तर!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!