Share

वसंत मोरेंची पदावरून हकालपट्टी, साईनाथ बाबरांकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी

Published On: 

मुंबई : मनसेचे नेते वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे, अशी माहिती मिळत आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पुणे मनसे पदाधिकाऱ्यांची चर्चा होत आहे, या दरम्यानच मोरेंना पदावरून हटवण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतल्याचे समजते. आता पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे देण्यात आलेले आहे.

याबाबत मनसेने अधिकृत पत्र जाहीर केले आहे. शहराध्यक्षपदाची जबाबदारी आता बाबर यांच्याकडे देण्यात आली आहे .वसंत मोरे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत होती. मोरे नाराज असल्याचेही बोलले जात होते. यातच त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे.

दरम्यान राज ठाकरे यांच्या ९ तारखेच्या सभेसाठी वसंत मोरे यांना निमंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच मोरे यांनी पक्षाचा व्हाट्स अँप ग्रुप सोडल्याचे बातम्या आले आहेत. वसंत मोरे नाराज असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. मोरे हे राष्ट्रवादीत जातील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या :

काय आहे किणी खून प्रकरण? ज्यावरुन राज ठाकरेंना आजही केलं जातेय टार्गेट
अजित पवारांच्या उपस्थितीत अभिनेत्री आसावरी जोशी आणि स्वागता शाह यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
नगरसेवक वसंत मोरेंचा मनसेला रामराम? पक्षाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट!
IPL 2022 : सूर्य कुणीकडं उगवला..! दीपक हुडानं कृणाल पंड्याला म्हटलं ‘भाऊ’; वाचा सविस्तर!
“पैसे योग्य ठिकाणी गुजरातला तर…”, अमोल मिटकरींचा किरीट सोमय्यांवर निशाणा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!