🕒 1 min read
मुंबई : पॅट कमिन्सच्या झंझावाती खेळीच्या बळावर कोलकाताने बुधवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध जबरदस्त विजय मिळवला. त्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया उमटल्या, यात भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेदेखील मत दिले. सेहवागने आपल्या ट्वीटमध्ये ‘वडा पाव’ हा शब्द वापरला आणि त्यानंतर त्याला मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने केकेआरच्या १०१ धावसंख्येवर पाच विकेट्स घेतल्या होत्या आणि ते विजयाच्या मार्गावर होते, परंतु येथून पॅट कमिन्सने आयपीएल इतिहासातील संयुक्त-जलद अर्धशतक झळकावले आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. कमिन्सच्या १५ चेंडूत नाबाद ५६ धावा केल्याबद्दल सेहवागने ट्वीट केले. ”तोंडातून घास हिसकावून घेतला, सॉरी वडा पाव हिसकावून घेतला. पॅट कमिन्स, क्लीन फटकेबाजीची, सर्वोत्तम कामगिरी”, असे ट्वीट सेहवागने केले.
मात्र, रोहित शर्माच्या चाहत्यांना हे ट्वीट आवडले नाही त्यांनी सेहवागला फटकारले. यानंतर सेहवागने पुन्हा ट्वीट करत सफाई दिली. सेहवागने लिहिले, ”वडापावचा संदर्भ मुंबईशी निगडित आहे, रोहितच्या चाहत्यांनो थंड घ्या, तुमच्यापेक्षा मी त्याच्या फलंदाजीचा मोठा चाहता आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 : सूर्य कुणीकडं उगवला..! दीपक हुडानं कृणाल पंड्याला म्हटलं ‘भाऊ’; वाचा सविस्तर!
- “पैसे योग्य ठिकाणी गुजरातला तर…”, अमोल मिटकरींचा किरीट सोमय्यांवर निशाणा
- “मातृभूमीचा लिलाव करून बाजार मांडणारे महात्मा किरीट सोमय्या”; राऊतांचा टोला
- वसंत मोरे राष्ट्रवादीच्या वाटेवर ? राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसेत नाराजीनाट्य
- “…ही अन्यायकारक दरवाढ मागे घ्या”, काँग्रेसची मागणी
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
