Share

…आम्ही सरकार पाडण्याचा प्रश्नच नाही- प्रकाश जावडेकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला असून भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उतरवणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तसेच या मुद्द्यावरून भाजप नेत्यांकडून विरोधकांवर निशाणा साधण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार तसेच माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी आम्ही सरकार पाडण्याचा प्रश्नच नाही, असे म्हंटले आहे.

काल(१० मार्च)सायंकाळी एका चर्चासत्रात बोलत असतांना प्रकाश जावडेकर म्हणाले की,‘आम्ही सरकार पाडण्याचा प्रश्नच नाही. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये असंतोष असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना कागदावर बहुमत आहे, विधानसभेत बहुमत आहे त्यांचं त्यांचं चालू आहे. आम्ही काय केलं पाडायला?’, असे जावडेकर म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय संस्था पाठवल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. यासंदर्भात विचारण्यात आले असता जावडेकर म्हणाले की,‘त्याचा काय संबंध. तुमच्याकडे केंद्रीय संस्था पाठवल्या तरी तुम्ही तुमचं पत्रकारितेचं काम करत राहाल. कर नाही त्याला डर कशाला? काहीतरी केलं असेल तर माणूस घाबरेल’, असे जावडेकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!