Share

“महाराष्ट्रातील सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं”, कुमार केतकर यांचे मोठे वक्तव्य

Published On: 

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला असून भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उतरवणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तसेच या मुद्द्यावरून भाजप नेत्यांकडून विरोधकांवर निशाणा साधण्यात येत आहे. असे असतांनाच आता महाराष्ट्रातील सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं, असे वक्तव्य काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर (Kumar Ketkar) यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

काल(१० मार्च)सायंकाळी एका चर्चासत्रात बोलत असतांना कुमार केतकर म्हणाले की,‘महाराष्ट्राचे सरकार कोणत्याही क्षणी जायला तयार आहे. त्यांनी मिशन कमळ काढलं तर जातील.’ तसेच महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून मी हेच सांगतोय. तीन पक्षांचा सरकार आहे. ते वेगवेगळ्या यंत्रणा वापरत नाहीत. ते प्रमाणिक लोक आहेत त्यांच्या घरी छापे टाकत नाहीत. उदाहरणार्थ नारायण राणे आहेत. महाराष्ट्रातील सरकार कोणत्याही क्षणी जाऊ शकेल. म्हणजे आपण आत्ता बोलतोय ना तिकडे सरकारला सुरुंग लावण्याची तयारी सुरु झालेली असेल, असेही कुमार केतकर म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘भाजपचे प्रत्येक वक्तव्य वादग्रस्त होतं असं सांगत २०१४ मध्ये युती तोडून वेगवगेळं कोण लढलं?,’ असा सवाल केतकरांनी केला. तसेच साधनसुचितेने भाजप काम करते, असेही केतकर म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!