🕒 1 min read
मुंबई: ICC ने गुरुवारी रावळपिंडी येथील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीला “सरासरीपेक्षा कमी” असे रेट केले आहे. यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे अध्यक्ष रमीझ राजा यांनी प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानी क्रिकेट चाहते आणि माजी खेळाडू यामुळे निराश झालेले दिसले. यावेळी अनेक माजी खेळाडूंनी पीसीबीवर निशाणा साधला आहे.
माजी पाकिस्तानी खेळाडू सलमान बटने (salman butt) रावळपिंडी पीचवर होणाऱ्या वादावर मोठे वक्तव्य केले आहे. ज्यात त्याने पीचचा बचाव करत PCBवर निशाणा साधला आहे. “दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, हसन अलीने रावळपिंडीत चमकदार कामगिरी केली, ते स्टेडियम कुठेतरी वेगळे होते का? त्यामुळे कोण कोणती माहिती देत आहे हे मला समजत नाही. जो कोणी आकडे बघेल त्याला सत्य कळेल. कृपया मला सांगा पाकिस्तानच्या पीचमध्ये काय चूक आहे. पीच वाईट नसतात, त्यामागील लोकांचा मेंदू कुजलेला असतो. जे लोक क्रिकेटचे कारभार सांभाळत आहेत.. आपण खेळू शकत नाही असे समजत ते स्वतःला कमी लेखतात.”
उरलेल्या दोन सामन्यांमध्ये खेळपट्ट्या अधिक खेळीदार असायला हव्यात, असे सलमान बटने आवर्जून सांगितले आहे. “मला वाटते हा योग्य दृष्टिकोन नाही. मी कुठेतरी वाचले की समालोचकांना विनंती केली गेली होती की पीचबद्दल बोलू नका. हे मी ट्विटरवर वाचले. मला आशा आहे की तसे होणार नाही. तुम्ही स्पिन पीच बनवता, तुम्ही रिव्हर्स स्विंगला मदत करणाऱ्या पीच बनवता. आक्रमक पीच बनवा. या पिचवर कोणासाठी काहीही नव्हते.”
महत्वाच्या बातम्या
- “…त्या प्रेतांची पर्वा न करता लोकांनी पुन्हा भाजपला मतदान केले”, राऊतांचा घणाघात
- “…तेव्हा निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते”, संजय राऊतांनी व्यक्त केला संशय
- राजकारणात ५० वर्ष घालवूनही विरोधकांकडे कसलेही अनुभव नाहीत- चंद्रकांत पाटील
- ‘त्याने खोटे बोलत चाहत्यांचा विश्वासघात केला’ माजी पाकिस्तानी खेळाडूचा रमीझ राजांवर हल्ला
- “पराभवापेक्षा विजय पचवणे कठीण; भाजपला या विजयाचे अजीर्ण होऊ नये”, शिवसेनेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
