Share

“…तेव्हा निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते”, संजय राऊतांनी व्यक्त केला संशय

Published On: 

मुंबई: पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल काल (१० मार्च) लागले. आणि पाच पैकी चार राज्यांत भाजपने आघाडी घेतली. मात्र यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी सामना अग्रलेखातून निवडणूक आयोगावर संशय व्यक्त केला आहे.

राकेश टिकैत हे शेतकऱ्यांचे नेते. त्यांनी सांगितले ,“लोकांच्या मनात भाजपविषयी राग होता, लोकांनी भाजपला मतदान केले नाही, तरीही ते कसे विजयी झाले? हे गौडबंगाल आहे.” भारतीय जनता पक्ष कसा काय विजयी झाला? हा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा लोकशाही व निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. तसे ते झालेच आहे. असा संशय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी जे मिशन राबवले त्यास ‘ऑपरेशन गंगा’ असे नाव देऊन उत्तर प्रदेशातील निवडणुकांचा प्रचार जोरात केला. म्हणजे युक्रेनमधील अडकलेल्या मुलांचा आक्रोश आणि दमछाक यांचा वापरही राजकीय फायद्यासाठी कसा करावा हे भाजपकडून शिकावे. असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!