🕒 1 min read
नवी दिल्ली : युरोप खंडात युक्रेन आणि रशिया या दोन देशात सध्या युद्ध चालू आहे. युक्रेनने अमेरिका प्रणित NATO या लष्करी आघाडीमध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा अवलंबविला आहे. या युद्धामुळे जगातील अनेक देशांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागत आहे. भारत सुद्धा याला अपवाद नाहीये.
भारतातून दर वर्षी अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घ्यायला युक्रेनमध्ये जात असतात. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ हा उपक्रम सुरु केला आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत आत्तापर्यंत युक्रेनमधून १७ हजार पेक्षा जास्त युक्रेनमध्ये अडकलेले नागरिक भारतात परतले आहेत. तर काही भारतीय नागरिक अजूनही युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी झगडत आहेत.
त्यातच आज रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलिपोव यांनी एक विधान केलं आहे. डेनिस अलिपोव यांच्या म्हणण्यानुसार “उत्तर पूर्व युक्रेनमध्ये चालू असणाऱ्या तुफान चकमकीमुळे आम्ही रशियन लष्कर उत्तर पूर्वमध्ये अडकलेल्या भारतीयांपर्यंत पोहचू शकत नाहीये. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितरित्या बाहेर काढणे हे आमचे उद्दिष्ट्य आहे”.
महत्वाच्या बातम्या :
- ‘कच्चा बदाम’ला मागे टाकत पावनखिंडच्या गाण्यावर नाचणाऱ्या चिमुकलीचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
- IND VS SL : संघ सहकाऱ्यांनी विराटला ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन केले सन्मानित, तर विराटने…
- राष्ट्रीय OBC महासंघाचा आक्रमक पवित्रा; आरक्षण लढ्याची पुढची दिशा काय असेल?
- Russia-Ukraine war: युक्रेनियन सैनिकांनी जिवंत रशियन बॉम्ब बरोबर फोटो केला शेअर
- तूर उत्पादकाला मोठा दिलासा, तुरीला 6 हजार 500 पर्यंत मिळतोय दर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
