लातूर : सोयाबीनचे दर स्थिरावले आहे परंतु तुरीला चांगला दर मिळत आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. तुरीला दर काय मिळतोय? पाहूया सविस्तर..
तुरीच्या दरात वाढ
खरीप हंगामातील तुर जास्त असल्यामुळे बाजारपेठेत तुरीची आवक वाढली आहे तसेच दरही चांगला मिळत आहे. तुरीला सध्या हमीभाव केंद्रात जसा दर चालू आहे अगदी तसाच खुल्या बाजारपेठेतही मिळत आहे. राज्यात खरेदी केंद्र सुरु होण्याआधी तुरीला 5 हजार 800 इतकादर होता. पण मागच्या दोन महिन्यांमध्येच तूर उत्पादकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. मागच्या २ महिन्यात तुरीला 6 हजार 300 प्रमाणे दर मिळत आहे.
खरेदी केंद्रावर किचकट प्रक्रिया असते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे यामुळे शेतकरी खरेदी केंद्राकडे माल विक्री करण्यापेक्षा व्यापाऱ्यांकडेच माल विक्री करत आहेत. खरेदी केंद्रापेक्षा खुल्या बाजारात विक्री करणे याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
महत्वाच्या बातम्या –


