नवी दिल्ली : मोहाली येथे विराट कोहली कसोटी कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना खेळत आहे. भारताने आपला पहिला डाव ५७४ धावांवर घोषित केला. क्षेत्ररक्षणासाठी जेव्हा भारतीय संघ मैदानात उतरला तेव्हा सर्व संघ सहकाऱ्यांनी किंग कोहलीला सन्मान दिल्याचा एक व्हिडीओसमोर आला आहे.
संघातील खेळाडूंनी मिळून कोहलीला ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मानित केले. बीसीसीआयने याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत खेळाडू त्याला सन्मानित करत आहेत व विराटने ही हात जोडून सहकाऱ्यांचे आभार मानले. विराट भारताकडून १०० कसोटी खेळणारा १२ खेळाडू बनला आहे.
https://www.instagram.com/p/Cat0oreDq3o/?utm_source=ig_web_copy_link
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चहापाणा अगोदर भारताने पहिला डाव घोषित केला. भारताने हा डाव ८ विकेट्स गमावून ५७४ धावांवर घोषित केला. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक नाबाद १७५ धावा केल्या. तर अश्विनने ६१, व हनुमा विहारीने ५८ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून सुरंगा लकमल, विश्वा फर्नांडो, आणि लेसिथ एम्बुल्देनिया यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

