🕒 1 min read
नवी दिल्ली : युक्रेनने अमेरिका प्रणित NATO या लष्करी आघाडीमध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर यांनी आक्रमक पवित्रा अवलंबविला आहे . रशियाच्या लष्करासमोर युक्रेनच्या लष्कराचा निभाव लागणे कठीण आहे. तरी व्होलोडिमिर झेलेन्स्की हे एकहाती युक्रेनकडून खिंड लढवत आहेत. व्लादिमीर पुतीन यांना व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी चर्चेचे आवाहन दिले होते. मात्र रशियाकडून आम्ही युक्रेनने काही मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही चर्चेस तयार होणार नाही असे उत्तर दिले आहे.
२४ फेब्रुवारी पासून रशियाचे लष्कर युक्रेनवर सतत हल्ले करत आहे. आम्ही आमच्या वायुसेनेचा वापर मर्यादित प्रमाणात करणार आहोत अशी ग्वाही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडून देण्यात आली असली तरी रशियाने बऱ्याच वेळा युक्रेनवर हल्ला करण्यासाठी आपल्या हवाई दलाचा वापर केला आहे. रशियन लष्कर मोठ्या प्रमाणात युक्रेनच्या विविध शहरांवर बॉम्ब वर्षाव करत आहे. त्यातच आज युक्रेनच्या काही सैनिकांनी दोन जिवंत रशियन बॉम्बसह फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ओखतिरखा या युक्रेनमधील शहरात युक्रेनच्या सैनिकांनी दोन रशियन जिवंत बॉम्ब सह फोटो काढला आहे. आजच रशियन हवाईदलाने आणि लष्कराने ओखतिरखा शहरातील औष्णिक वीज केंद्रावर जोरदार मिसाईल आणि बॉम्ब हल्ले केले आहेत. ओखतिरखा औष्णिक वीज केंद्रावर काम करणाऱ्या एका युक्रेरिअन नागरिकाने सांगितले कि,” रशियाच्या मते आमचा देश आण्विक शक्ती प्राप्त करू इच्छित आहे. मात्र आमचे आण्विक ताकद प्राप्त करण्याचे कोणतेही उद्दिष्ट नसून , रशियाने आमच्या औष्णिक केंद्रावर केलेल्या हल्ल्यात आमचे दोन सैनिक ठार झाले असून ३ सैनिक गंभीर जखमी झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- सलमान खान आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ यांचा आगामी ‘टायगर ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
- पाच राज्याच्या निवडणुका होताच केंद्र सरकार पेट्रोल-डिझेल दरवाढ करणार; रोहित पवारांनी साधला निशाणा
- “पुणे जसं शिक्षणाचं माहेर घर आहे तसं युक्रेन…”; शरद पवारांनी सांगितल्या जून्या आठवणी
- “आपण काय केलं याची चर्चा करण्यापेक्षा…”, पंतप्रधान मोदींना शरद पवारांचा सल्ला
- सलमान खानसोबत चक्क लग्नाचे फोटो ? सोनाक्षी सिन्हाने केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
