औरंगाबाद: १ मे ‘महाराष्ट्र दिन’ हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा होतो. पण यावर्षी ‘महाराष्ट्र दिन’ ला मोठ्या दोन घडामोडी घडणार असल्यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे. १ मे रोजी औरंगाबादमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार होणार आहे, तर दुसरीकडे याच दिवशी पुण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सभा घेण्याची घोषणा केली आहे.
औरंगाबाद येथे १ मे रोजी होणाऱ्या जाहीर सभेची राज्यभरात जोरदार चर्चा सुरु आहे. या सभेला पोलिसांनी काही दिवसांपूर्वी परवानगी दिली आहे. पण ही परवानगी देताना पोलिसांनी तब्बल १६ अटीही ठेवल्या आहेत. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी औरंगाबाद येथे पोहोचलेले राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी अटी-शर्थींवरून थेट पोलीस प्रशासनालाच आव्हान दिले आहे. राज ठाकरे यांच्या सभेला मोठी गर्दी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घालून दिलेली आवाजाची मर्यादा पाळणं शक्य होईल का? असा प्रश्न अमित ठाकरे यांना पत्रकारांनी विचारला तेव्हा यावर बोलताना, “१ मे रोजी होणारी सभा भव्य-दिव्य असेल आणि आम्ही अंगावर केसेस घ्यायला तयार आहोत” असे थेट वक्तव्य अमित ठाकरे यांनी केले.
पोलिसांनी ठेवलेल्या अटी आणि शर्ती –
१) सभा १ मे रोजी दुपारी ४.३० ते रात्री पावणे दहा वाजेच्या दरम्यान घ्यावी. या वेळेत बदल करू नये.
२) सभेत आक्षेपाहार्य घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन होणार नाही याची काळजी घ्यावी.
३) शहरात मोटारसायकल, कार रॅली काढू नये.
4) सभास्थानाच्या आसन व्यवस्थेची कमाल मर्यादा १५ हजार इतकी आहे. १५ हजारपेक्षा अधिक लोकांना आमंत्रित करू नये.
५) सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म किंवा प्रथा आणि परंपरा यावरून व्यक्ती किंवा समुदायाचा अपमान होईल, असे चिथावणीखोर भाषण किंवा कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी करू नये.
६) सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आवाज असावा.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

