Share

“…तेव्हा उद्धव ठाकरे कॅमेरा साफ करत मातोश्रीत बसले होते”, नितेश राणेंचा टोला

Published On: 

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी तसेच मविआ सरकारवरही निशाणा साधला होता. राज ठाकरेंच्या भूमिकेला भाजपकडून खुलेपणाने समर्थन देण्यात आले. दरम्यान या पार्श्वभूमीवरच काल (२९ एप्रिल) शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबरी मस्जिद पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? असा सवाल करत भाजपवरही निशाणा साधला. यावरच भाजप नेते नितेश राणे यांनी ट्वीट करत  प्रत्युत्तर दिले आहे.

“बाबरी मस्जिद पाडताना राज ठाकरे कुठे होते माहीत नाही. पण उद्धव ठाकरे नक्कीच त्यांचा कॅमेरा साफ करत मातोश्रीत बसले होते.”, असा खोचक टोला नितेश राणे यांनी ट्वीट करत लगावला आहे.

दरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजपच्या आरोपांना सडेतोड उत्तर द्या, भाजपवर तुटून पडा असे आदेश कालच्या बैठकीत कार्यकर्त्यांना दिले आहेत. तर राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम ठाकरे सरकारला दिला आहे. त्यात उद्या १ मे रोजी त्यांची औरंगाबादेत जाहीर सभा होणार आहे. या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!