🕒 1 min read
मुंबई : २७ एप्रिल रोजी कोविडविषयक घेतलेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पेट्रोल-डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारने व्हॅट कमी न केल्यानेच महाराष्ट्रातील जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप केला. तद्पश्चात या टीकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधानांना चोख उत्तर दिले. दरम्यान, याच मुद्द्यावरून आता भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात निलेश राणे यांनी ट्विट केले असून ते म्हणाले आहेत की,‘आजूबाजूच्या राज्यात पेट्रोल डिझेल वरचा VAT कमी करून महाराष्ट्रापेक्षा पर लिटर 15 रुपयांनी पेट्रोल डिझेल कमी आहे. पण ठाकरे सरकारला टोमणे मारण्यात आणि टीका करण्यात जास्त रस आहे. VAT तर कमी करत नाही पण राज्याची वाट 100% लावत चाललेत’, अशी घणाघाती टीका निलेश राणेंनी केली आहे.
आजूबाजूच्या राज्यात पेट्रोल डिझेल वरचा VAT कमी करून महाराष्ट्र पेक्षा पर लिटर 15 रुपयांनी पेट्रोल डिझेल कमी आहे पण ठाकरे सरकारला टोमणे मारण्यात आणि टीका करण्यात जास्त रस आहे. VAT तर कमी करत नाही पण राज्याची वाट 100% लावत चाललेत.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 30, 2022
दरम्यान, ‘मुंबईत आज एक लिटर डिझेलच्या दरामध्ये २४ रुपये ३८ पैसे केंद्राचा, तर २२ रुपये ३७ पैसे राज्याचा कराचा वाटा आहे. पेट्रोलच्या दरात ३१ रुपये ५८ पैसे केंद्रीय कर, तर ३२ रुपये ५५ पैसे राज्याचा कर आहे. त्यामुळे राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले आहे ही वस्तुस्थिती नाही. महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात (डायरेक्ट टॅक्स) महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे १५ टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो. थेट कर आणि जीएसटी असे दोन्ही कर एकत्र केले तर महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे, असं असूनही आजही राज्याला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी आहे, ‘असे मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधानांच्या टीकेला उत्तर देत म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
- “…हा सगळा प्रकार ‘वरातीमागून घोडे’ असाच आहे”, संजय राऊत यांचा केंद्र सरकारला टोला
- Aurangabad MNS Sabha : राज ठाकरेंना खासदार इम्तिजाय जलील यांनी दिले इफ्तार पार्टीचे आमंत्रण; म्हणाले, “जे राजकारणासाठी…”
- “…याची जाणीव केंद्राला असायला हवी होती”, संजय राऊत यांचे टीकास्त्र
- ‘मनसे’ नेत्याला कल्याण पोलिसांची नोटीस; संदीप देशपांडेंनी म्हटले, “‘शिव’ की ‘सेना’ कहलाने वाला…”
- “यांच्या पायाखालची जमीन सरकल्यामूळेच…”, अविनाश जाधवांची मविआ सरकारवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
