Share

“विरोध ‘मजहब’ला नाही, तर…”, मनसे नेत्याचं सूचक वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळाले. असे असतांनाच १ मे रोजी औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आणखी काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आमचा विरोध ‘मजहब’ला नाही, तर ‘गहजब’ला आहे, असे सूचक वक्तव्य मनसे नेते राजू पाटील (Raju Patil) यांनी केले आहे.

यासंदर्भात राजू पाटील यांनी ट्विट केले असून ते म्हणाले आहेत की,‘हा धार्मिक नाही,तर सामाजिक मुद्दा आहे. तसेच यामध्ये नवीन काहीच नाही,जुनाच कायदा आहे. आमचा विरोध ‘मजहब’ला नाही, तर ‘गहजब’ला आहे’, असे पाटील म्हणाले आहेत. तसेच यासह त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत नागरिकांना राज ठाकरेंच्या सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. ही मुदत संपण्यासाठी केवळ काही दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी १ मे रोजी औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा होणार असल्याचे ते यावेळी आणखी काय बोलतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!